चोपडा येथे भव्य विष्णू यज्ञ व मंदिर पाया पूजन सोहळा उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- शहरातील नवकार सि...
चोपडा येथे भव्य विष्णू यज्ञ व मंदिर पाया पूजन सोहळा उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- शहरातील नवकार सिटी, श्री श्याम सुंदर धाम येथे खाटू श्याम बाबा मंदिराच्या बांधकामासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य विष्णू यज्ञ व पाया पूजन सोहळा दिनांक ४ एप्रिल रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. या पवित्र सोहळ्यात २१ जोडप्यांनी श्रद्धापूर्वक सहभाग घेत विधिवत धार्मिक विधी पूर्ण केले. वैदिक मंत्रोच्चार, यज्ञकुंडातील होम आणि पूजनामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाची अनुभूती निर्माण झाली. या पवित्र सोहळ्यात पाया पूजनाचा विधी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाला. श्री घनश्याम काका अग्रवाल, सौ. नम्रता ताई पाटील (चोपडा शहरातील लोकनियुक्त नगर अध्यक्ष), श्री. रवींद्र भाऊ पाटील, श्री. संजय काका शर्मा, श्री. गजेंद्र भाऊ जयस्वाल, श्री. विकी शेठ अग्रवाल तसेच श्री. शुभम दादा शर्मा श्री. प्रेम भाऊ घोगरे यांच्या शुभहस्ते पाया पूजन सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांनी मंदिर उभारणीसाठी शुभेच्छा देत धार्मिक कार्याला आपला पाठिंबा दर्शविला.
या प्रसंगी चोपडा शहरासह परिसरातील श्याम भक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष भव्यता प्राप्त झाली. उपस्थित सर्व भाविकांनी यज्ञात सहभागी होत मंदिर उभारणीच्या कार्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री श्याम धनी सेवा फाउंडेशन तसेच स्थानिक व परिसरातील समस्त श्याम प्रेमींच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण यज्ञ श्री. विवेक कुलकर्णी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यज्ञस्थळी आकर्षक सजावट, शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रसाद व अल्पोपहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या भव्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री श्याम धनी सेवा फाउंडेशन व चोपडा शहरातील व परिसरातील सर्व श्याम भक्तांनी मनापासून परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक, आध्यात्मिक व सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली असून, भविष्यातील मंदिर उभारणीसाठी हा एक शुभारंभ मानला जात आहे.
— जय पंडितराव शिंदे


No comments