adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरात मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० रुग्णांची तपासणी, २७ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया निश्चित

 फैजपूरात मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० रुग्णांची तपासणी, २७ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया निश्चित  इदू पिंजारी फैजपूर  ...

 फैजपूरात मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० रुग्णांची तपासणी, २७ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया निश्चित 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे दि.८ एप्रिल २०२६ रोजी, बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत समता फाऊंडेशनतर्फे फैजपूर येथील ताहा नगर, टीपू सुलतान चौक परिसरात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी जळगाव येथील कांताबाई नेत्रालयातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण ७० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. यापैकी २७ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. संबंधित रुग्णांना जळगाव येथे नेणे आणि आणणे करण्याची तसेच भोजनाची संपूर्ण व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.


उद्या सकाळी ११ वाजता रुग्णांना त्यांच्या घरातून नेऊन शस्त्रक्रिया करून पुन्हा सुरक्षित परत आणले जाणार आहे. या शिबिरावेळी माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम, नगरसेविका सुमैया बी. शेख कुर्बान उपस्थित होत्या. तसेच हाजी खलील अहमद, शेख मोहसिन यांच्यासह कुर्बान मेंबर यांच्या निवासस्थानी हे शिबिर पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख मुजम्मील, रहमान, समीरभाई, गड्डूभाई, शोएब मनियार तसेच कांताबाई नेत्रालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments