संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करावे - धिरज फाटे अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव ...
संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करावे - धिरज फाटे
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव - तालुक्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातच स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले असून धीरज फाटे यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. "स्मार्ट मीटर बसवने सक्तीचे नाही,, असा ठाम दावा करत त्यांनी महावितरण कंपनी खाजगी एजन्सीवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय घराघरात स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे धीरज फाटे यांनी नागरिकांना थेट आवाहन करताना संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करावे असे सांगत संघर्षाची दिशा स्पष्ट केली त्यांच्या या भूमिकेमुळे सामान्य ग्राहकांच्या मनातील दडपलेला रोष आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे ग्राहकांची लूट हा शासनाचा डाव आहे आणि तो आपण एकत्र येऊन आणून पडला पाहिजे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले या प्रकरणात केवळ तांत्रिक बदलाचा मुद्दा नसून तो थेट आर्थिक परिणामांशी जोडलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आज आपण गप्प बसतो तर उद्या त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतील असा इशारा देत त्यांनी भविष्यातील संभाव्य संकटाची जाणीव करून दिली भाजप सरकारवर टीकेची धार वाढवत म्हणाले "बिनकामी योजना गोरगरिबांवर लादून आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर शक्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत फाटे यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे स्मार्ट मीटरचा मुद्दा हा केवळ तांत्रिक सुधारणा न राहता तो जनतेचा हक्क,संपत्ती आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न बनत चालला आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर हा रोश व्यापक आंदोलनात परिवर्तित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे.

No comments