चोपडा नगरपरिषदेत विविध विकासकामांना गती; महिला सक्षमीकरण ते हरित प्रकल्पांना प्राधान्य चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा...
चोपडा नगरपरिषदेत विविध विकासकामांना गती; महिला सक्षमीकरण ते हरित प्रकल्पांना प्राधान्य
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषदेकडून सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात विविध महत्त्वपूर्ण विकासकामे हाती घेण्यात आली असून, शहराच्या सर्वांगीण विकासासोबत महिला सक्षमीकरण, आरोग्य संवर्धन व पर्यावरण संरक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
महिला बचत गटांसाठी ‘बहिणा मार्ट’ व्यापारी संकुल
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला बचत गट सक्षमीकरणासाठी ‘बहिणा मार्ट’ व्यापारी संकुल विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कामाची किंमत: रु. २,५०,१८,७४९/-
प्रशासकीय मान्यता: ०५ जून २०२५
कार्यादेश: २० ऑगस्ट २०२५
कामाची मुदत: १२ महिने
या प्रकल्पामुळे शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
‘नमो उद्यान’मुळे आरोग्यदायी वातावरण
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चोपडा शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे.
कामाची किंमत: रु. १,०४,५०,६०७/-
प्रशासकीय मान्यता: ०७ फेब्रुवारी २०२६
कार्यादेश: १२ मार्च २०२६
मुदत: १२ महिने
राज्यशासन हिस्सा: १००%
या उद्यानामुळे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनास चालना मिळणार आहे.
अमृत 2.0 अंतर्गत हरित पट्टा व उद्यान विकास
अमृत 2.0 योजनेअंतर्गत बोरोले नगर व पंडित कॉलनी परिसरात हरित पट्टा व उद्यान विकसित करण्यात येणार आहे.
कामाची किंमत: रु. १.९५ कोटी
प्रशासकीय मान्यता: २२ मे २०२५
कार्यारंभ आदेश: १८ ऑगस्ट २०२५
कामाची मुदत: १२ महिने
वित्तीय सहभाग:
केंद्र शासन: ५०%
राज्य शासन: ४०%
नगरपरिषद: १०%
या प्रकल्पामुळे शहरातील पर्यावरण संतुलन व नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे.
आगामी महत्वाकांक्षी प्रकल्प
चोपडा नगरपरिषदेकडून भविष्यातील मोठ्या प्रकल्पांचीही योजना आखण्यात आली आहे:
रत्नावती नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण
अंदाजित किंमत: रु. १८५ कोटी
प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर
या प्रकल्पामुळे नदीचे पुनरुज्जीवन होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
रस्ते विकास प्रकल्प
अंदाजित किंमत: रु. १५३ कोटी
प्रस्ताव शासनाकडे सादर
या प्रकल्पामुळे शहरातील विस्तारलेल्या भागात मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.
या सर्व विकासकामांची माहिती देताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.सूत्रसंचालन आर एम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगर अभियंता दिगंबर वाघ यांनी केले. एकूणच, चोपडा नगरपरिषदेकडून हाती घेतलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून, नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत सोनवणे,नगराध्यक्षा नम्रता पाटील,उपनगराध्यक्ष पंकज बोरोले,डॉ.स्मिता पाटील,सभापती नरेंद्र पाटील,चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर आणि कर्मचारी यांच्यासह नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments