हिंगोली जिल्हा हादरला, आईच्या अनैतिक संबंधात 24 वर्षीय मुलगा अडसर ठरला; आईने प्रियकरांच्या मदतीने मुलाला संपविले! (हिंगोली जिल्हा) सौ. अनु...
हिंगोली जिल्हा हादरला, आईच्या अनैतिक संबंधात 24 वर्षीय मुलगा अडसर ठरला; आईने प्रियकरांच्या मदतीने मुलाला संपविले!
(हिंगोली जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या मध्ये अनैतिक संबंध लपवण्यासाठी अन् प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या जन्मदात्या आईने 24 वर्षीय मुलाला आपल्या प्रियकरांच्या मदतीने सुपारी देवुन मुलाची हत्या केली आहे. या घटनेने हिंगोली जिल्हा हादरला आहे. दोन दिवसांपूर्वी सेनेगांव तालुक्यांतील जामदाया या शिवारांत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने फिरवली आणि मृताची ओळख पटवली मृत तरुण विदर्भातील लोणार काढवण गावचा रहिवासी असून त्याचे नाव सचिन राजगुरू असे समोर आले आहे. अखेर पोलीस तपासात सत्य समोर आले, सचिनच्या हत्येमागे त्याचीच आई लिलाबाई असून तिचे 65 वर्षीय रामदास तनपुरे यांच्याशी प्रेम संबंध होते. या संबंधांना सचिनचा विरोध होता. तो त्यांच्यासाठी अडथळा ठरत होता. याच कारणांतून आई आणि तिचा प्रियकरांनी मिळून सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. अखेर या दोघांनी नरेश पवार याला 25 हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी तपास मोबाईल लोकेशन आणि इतर पुरावांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. या मध्ये लिलाबाई तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि मुख्य आरोपी नरेश पवार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधसाठी आपल्या जन्मदात्या आईनेच प्रियकरांच्या मदतीने जन्मदात्या मुलाची हत्या केली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी मयूर रसाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेगांव पोलीस ठाणे कडील आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी या कारवाईत सहभागी घेतला.

No comments