फैजपूरच्या आशिष नगरमध्ये हनुमान मंदिराची स्थापना उत्साहात इदू पिंजारी फैजपुर ( संपादक – हेमकांत गायकवाड): फैजपूर येथील आशिष सराफ नगर परिस...
इदू पिंजारी फैजपुर
( संपादक – हेमकांत गायकवाड):
फैजपूर येथील आशिष सराफ नगर परिसरात आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी धार्मिक वातावरणात श्री गणेश मंदिर, हनुमान मंदिर आणि गजानन महाराज मंदिरांची विधिवत स्थापना करण्यात आली. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाचे यजमान म्हणून राकेश पाटील सपत्नीक, व चेतन पाटील सपत्नीक, व आकाश महाले सपत्नीक
यांनी अभिषेक व स्थापना विधी पार पाडला. तसेच मंदिराचा कळसही त्यांच्या हस्ते स्थापित करण्यात आला.
या वेळी महामंडलेश्वर पवनदासजी महाराज व परमपूज्य पूर्णानंद महाराज यांच्या हस्ते पूजाविधी पार पडले. तसेच योगी गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

No comments