adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंकज इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात

 पंकज इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात  चोपडा प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा ...

 पंकज इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात 


चोपडा प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत त्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, पालक प्रतिनिधी गजानन पाटील, धिरज बच्छाव,वर्षा पाटील आणि केतन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर नीता पाटील यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा आढावा सादर केला. पुढे सीनियर केजीच्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्य, गीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी केतन माळी यांनी आगामी शैक्षणिक वर्षाची रूपरेषा पालकांना समजावून सांगत १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या समर कॅम्पबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांसोबत केलेल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका रंजना तायडे, अनिता पाटील, श्रीमती कविता पारधी, नीता पाटील तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले....

No comments