adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी कट्ट्यासह फिरणारा आरोपी पकडला..घरातून तलवारही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

  गावठी कट्ट्यासह फिरणारा आरोपी पकडला..घरातून तलवारही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...

 गावठी कट्ट्यासह फिरणारा आरोपी पकडला..घरातून तलवारही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अहिल्यानगर प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


दि. 06 एप्रिल 2026 बेलवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत विसापुर (ता.श्रीगोंदा) येथे गावठी कट्टा,चार जिवंत काडतुसे व लोखंडी तलवार बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दि.03/04/2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,विसापुर येथील सरस्वती विद्यालयाच्या मागील भागात अशोक लक्ष्मण कराळे (रा. विसापुर,ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगून फिरत आहे.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले.पथकाने घटनास्थळी जाऊन शोधमोहीम राबवली असता,सरस्वती विद्यालयाच्या मागे एक संशयित इसम परिसरात टेहळणी करताना आढळून आला.पोलीसांनी त्यास ताब्यात घेत पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून देशी बनावटीच्या गावठी कट्ट्याचे चार जिवंत काडतुसे आढळून आली.त्याच्याकडे शस्त्र परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.त्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातील दिवाणाखाली एक लोखंडी तलवार सापडली. पुढील पोलीस कोठडीत तपासादरम्यान आरोपीकडून आणखी एक गावठी कट्टा (पिस्तुल) जप्त करण्यात आला. या कट्ट्यावर काळ्या रंगाचे पट्टे असून खाली मॅगझीन बसवलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटक करण्यात आलेला आरोपी अशोक लक्ष्मण कराळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भा.दं.वि. कलम 354 (ड) व पोक्सो कायदा कलम 12 (गु.र.नं. 80/2020), अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा (33/2015), महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे (485/2020, 103/2019) तसेच भा.दं.वि. कलम 143, 341 सह मुंबई पोलीस अॅक्ट 37(1)(3), 135 (गु.र.नं. 39/2019) यांचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबमे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे (कर्जत विभाग) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पो.हे.कॉ.भाऊसाहेब यमगर, पो.हे.कॉ.रविंद्र औटी,पो.हे.कॉ. भाऊसाहेब शिंदे,पोना शरद गांगर्ड,विनोद पवार,दादासाहेब क्षिरसागर,रवि जाधव,भापकर यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे करत आहेत..

No comments