adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारांवरील अन्याय थांबवावे व राज्यातील सर्व वृतपत्रांना १५० टक्के दरवाढ द्यावी - व्हॉईस ऑफ मीडिया

  पत्रकारांवरील अन्याय थांबवावे व राज्यातील सर्व वृतपत्रांना १५० टक्के दरवाढ द्यावी - व्हॉईस ऑफ मीडिया  छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी (संपाद...

 पत्रकारांवरील अन्याय थांबवावे व राज्यातील सर्व वृतपत्रांना १५० टक्के दरवाढ द्यावी - व्हॉईस ऑफ मीडिया 



छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक दृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे.आम्ही अनेक वेळा व्हाट्सअप मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले,आंदोलन केले पण त्याचा काही फायदा झाला नाही.तरी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना दीडशे टक्के दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता आणि पत्रकारावर होणारे अन्याय थांबवावे करिता बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसील कार्यालयात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व्हॉईस ऑफ मीडिया देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद आहे की

सन २०१९ पासून आस्थागायत कागद,प्रिंटिंग मटेरियल,केमिकल्स,वीज, मनुष्यबळ यासारख्या मूलभूत खर्चांमध्ये सुमारे दीडशे टक्के पर्यंत वाढ झालेली आहे परंतु याऊलट शासनाकडून मिळणाऱ्या जाहिराती घरांमध्ये कोणतीही समर्पक वाढ झालेली नाही त्यामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.करिता देऊळगाव तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे देत लाक्षणीक मागणी करत आंदोलन करण्यात आले.

या मध्ये सर्व वृत्तपत्रांना दीडशे टक्के दरवाढ द्यावी, ई - टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार २०० चौ. से निश्चित करणे, जाहिरात देयके ३० दिवसात अदा करणे,लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी देण्यात यावी तसेच पत्रकारावर होणारे हल्ले थांबवावे व पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या निवेदनावर तालुका अध्यक्ष विलास जगताप, अशरफ पटेल, सन्मती जैन, मुशिरखान कोटकर, सुनील मतकर, गजानन घुगे, अर्जुन आंधळे, देवानंद झोटे,विजय जाधव, पूजा कायंदे, हनीफ भाई, प्रदीप हिवाळे, दीपक नागरे, अमोल बोबडे, रमेश चव्हाण, गजानन भालेकर, खंडू माटे, मोहम्मद जमील, चंद्रभान झीने ,शब्बीर खान, नंदकिशोर देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


*वृत्त विशेष सहयोग*

ज्येष्ठ पत्रकार मनिष अग्रवाल 

छत्रपती संभाजीनगर 


*वृत्त प्रसिद्धी सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments