adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोल्हापूरकर अवैध धंदेना थारा नाही, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही; पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला !

 कोल्हापूरकर अवैध धंदेना थारा नाही, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही; पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला !   ( कोल्हापूर जिल्हा ) ...

 कोल्हापूरकर अवैध धंदेना थारा नाही, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही; पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला ! 


 ( कोल्हापूर जिल्हा ) रणजित मस्के प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला आहे. कोल्हापूर सारख्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वांच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल हे गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांनी तेथेही सर्वाधिक साडेतीन वर्षे उत्कृंष्ट सेवा बजावली. गडचिरोली मालेगांव मुंबई नागपूर येथील कामाचा अनुभव असलेले निलोत्पल आता कोल्हापूर एसपी म्हणून रुजू झाले आहेत. नक्षल वाद्यांचा खात्मा करणारे धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.


त्यांनी पदभार घेताच कोल्हापूरकरांनो, अवैध धंद्यांना थारा नाही, आणि गुन्हेगारांची गय  केली जाणार नाही, लोकाभिमुख सर्वांना सोबत घेवुन काम करणार असे आव्हान केले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कोल्हापुरांत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच विविध संवेदनशील प्रकरणाची प्रभावी हाताळणी करण्यात आली होती. महत्वांचे ड्रग्स कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या. त्यामुळे योगेशकुमार गुप्ता यांच्या कामाचे जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे. आणि याच कामाची दखल घेवुन शासनाने योगेशकुमार गुप्ता यांची पदोन्नतीने देत गडचिरोली येथे डीआयजी पदावर बढती दिली आहे.

No comments