नागपूर महापालिका आयुक्त पदाचा डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला; आयुक्तांना नागपूर जिल्ह्याचा दांडगा अनुभव! (नागपूर जिल्हा) संभाजी पु...
नागपूर महापालिका आयुक्त पदाचा डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला; आयुक्तांना नागपूर जिल्ह्याचा दांडगा अनुभव!
(नागपूर जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नागपूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत अतिरिक्त वैष्णवी बी. यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, यावेळी नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारताच शहरांतील नागरी सुविधा अधिक सक्षम करणे, पायाभूत सुविधा, मजबूत करणे, आणि प्रशासन कार्यक्षम करण्यावर विशेष भर दिला जाईल,असेही स्पष्ट सांगितले आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला डॉ. विपीन इटनकर हे सन 2014 बॅचच्या तुकडीतील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी वैद्यकीय शाखेतून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रांतील विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वांच्या पदावर काम पाहिले आहे. मावळते आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे येथे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर हे आयुक्त पद रिक्त झाले होते. तर डॉ. विपीन इटनकर नागपूर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे नव्या आयुक्तांना नागपूर जिल्ह्याचा दांडगा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.

No comments