मोताळा भाजपचे महाप्रशिक्षण अभियान संपन्न भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्याकडून महाप्रशिक्षण अभियानातून कार्यकर्त्यांना ऊर्जा अमोल बा...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा- संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान सुरू आहे. याचाच भाग म्हणून मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे व मोताळा मंडळाचा महाप्रशिक्षण अभियान वर्ग आज दि.५ एप्रिल २०२६ रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोताळा येथे संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विविध विषयांवर भाजपा नेत्यांनी प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. विजयराज शिंदे यांनी आपल्या भाषणातून अभियानाचे महत्त्व विशद करत कार्यकर्त्यांत ऊर्जा भरली.
“महाप्रशिक्षण अभियान हे केवळ एक औपचारिकता नसून कार्यकर्त्यांना वैचारिक, संघटनात्मक आणि निवडणूक तयारीसाठी सक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. पक्षाची विचारधारा, धोरणे आणि कार्यपद्धती प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून पक्षाची विचारधारा, सरकारची कामे, योजना जनतेपर्यंत पोहोचवावी, संघटन अधिक बळकट करावे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन सुद्धा मा.आमदार विजयराज शिंदे प्रशिक्षण अभियानातून कार्यकर्त्यांना केले.
जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, माजी जि प सदस्य पुरुषोत्तम लाखोटीया, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, जिल्हा सचिव प्रवीण खर्चे, जिल्हा सचिव अशोक किनोळकर, विधानसभा प्रमुख मंदार बाहेकर ,अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम चुनावाले, ज्येष्ठ नेते मनोहर नारखेडे, यशवंत पाटील, मोताळा मंडळ अध्यक्ष सचिन शेळके, धामणगाव बढे मंडळ अध्यक्ष सागर पवार महिला आघाडी अंजली पाटील, ज्योती चौके,भाजयुमो मंडळ अध्यक्ष दत्ता पाटील,मंगेश शिरसागर,श्रीकांत घाटे, भुरा ठाकुर, दादाराव जुनारे नाना राजगुरे,सुनिल भामद्रे, प्रवीण जवरे अनिल पवार संदीप वानरे नितीन हिवाळे, तुकाराम राठोड, पुरुषोत्तम दाते, विश्वासराव पाटील,महादेव शिराळ,नगरसेवक संदीप वानखेडे,तसलीम बाबा, यांसह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments