राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड तालुका प्रतिनिधी :- (संपादक -:- हेमकांत गायक...
राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड
तालुका प्रतिनिधी :-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार) व उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
राहुल जयकर हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व विकासाशी संबंधित विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक व पत्रकार बांधवांकडून राहुल जयकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी संवर्धन तसेच जनजागृतीसाठी व्यापक स्तरावर उपक्रम राबविण्याचा मानस राहुल जयकर यांनी व्यक्त केला आहे.

No comments