यावल महाविद्यालयात उर्दू विभागातर्फे ‘ईद मिलन’ उत्साहात; धार्मिक सलोख्याचा संदेश भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा ...
यावल महाविद्यालयात उर्दू विभागातर्फे ‘ईद मिलन’ उत्साहात; धार्मिक सलोख्याचा संदेश
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे उर्दू विभागाच्या वतीने ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उर्दू विभागाचे प्रा. इम्रान खान यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत सामाजिक एकात्मता व बंधुभाव वाढीस लागावा, हा हेतू असल्याचे सांगितले. यानंतर प्रा. रत्नाकर कोळी यांनी धार्मिक सलोखा कसा जपावा याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. आर. गायकवाड यांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी अशा एकात्मतेचे कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी एकोप्याची भावना जोपासत पुढील वाटचाल करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमानंतर उर्दू विभागातर्फे शिरखुरमा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरणार, उपप्राचार्य डॉ. हेमंत पाटील, डॉ. आर. डी. पवार, प्रा. भागवत पाटील, प्रा. पी. व्ही. पावरा, श्री. मिलिंद बोरघडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments