adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एलसीबीची मोठी कारवाई विना क्रमांकाच्या रिक्षेतून होणारी विदेशी दारूची तस्करी उघड..!

 एलसीबीची मोठी कारवाई विना क्रमांकाच्या रिक्षेतून होणारी विदेशी दारूची तस्करी उघड..!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहि...

 एलसीबीची मोठी कारवाई विना क्रमांकाच्या रिक्षेतून होणारी विदेशी दारूची तस्करी उघड..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- संगमनेर-अकोले रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून विदेशी दारूची तस्करी करणारी विना क्रमांकाची अ‍ॅपे रिक्षा पकडली आहे.या धडक कारवाईत पोलिसांनी ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून,एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत,तर मुख्य सूत्रधारासह वाईन शॉप चालक फरार झाले आहेत.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक संगमनेर भागात गस्तीवर होते.१५ एप्रिल रोजी जोर्वेकर विटभट्टी समोर संशयास्पदरीत्या उभी असलेली एक रिक्षा पोलिसांच्या नजरेत पडली.

तपासात धक्कादायक खुलासे

पोलिसांनी रिक्षेची झडती घेतली असता,त्यात विदेशी दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे समोर आले.चालक सुनील रामनाथ मोरे (४२,रा.गुंजाळवाडी) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली.ही दारू गणेश पंढरीनाथ मोरे याच्या सांगण्यावरून 'वेदांत वाईन्स शॉप' (संगमनेर-नाशिक रोड) येथून खरेदी केल्याचे त्याने कबूल केले.

जप्त केलेला मुद्देमाल:

विदेशी दारू: ७२,००० रुपये.

अ‍ॅपे रिक्षा: ३,००,००० रुपये.

एकूण कारवाई: ३,७२,००० रुपये.

गुन्हा दाखल व फरार आरोपींचा शोध याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) व ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुनील मोरे पोलिसांच्या ताब्यात असून, फरार आरोपी गणेश मोरे आणि वेदांत वाईन्सच्या मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे,संतोष खैरे,विजय पवार,योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ,अमृत आढाव आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

No comments