सहकार भारतीचे संस्थागत सदस्य नोंदणी अभियानाचा जळगाव जिल्ह्यात शुभारंभ सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांच्या उपस्थितीत सदस्य...
सहकार भारतीचे संस्थागत सदस्य नोंदणी अभियानाचा जळगाव जिल्ह्यात शुभारंभ
![]() |
| सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती देतांना |
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सहकार भारतीतर्फे संस्थागत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात उत्साहात करण्यात आला. या अभियानाची सुरुवात जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा बैठकीत झाली. या बैठकीस राष्ट्रीय संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदूरणीकर तसेच सहकार भारती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संजय बिर्ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
अलीकडेच लोणावळा येथे पार पडलेल्या प्रदेश बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रभर सहकारी संस्थांना सहकार भारतीचे सदस्य करून ‘सहकार समृद्धी’ या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जळगाव जिल्ह्यात हे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली. सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या सर्व सहकारी संस्था—जसे की सहकारी बँका, पतसंस्था, विकास सोसायट्या, दूध डेअरी आदींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार भारतीतर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीस उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील (चाळीसगाव), प्रवीण कुडे (धरणगाव), महानगर अध्यक्षा शोभाताई पाटील, महामंत्री प्रमोद नगरकर, शांताराम बापू, अनिता वाणी, आशुतोष अडावडकर, प्रवीण गडे, प्रवीण नाना उंबरखेडेकर, जयदीप शहा यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील ग्रामीण व महानगर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले.

No comments