adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे जनावरांची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन बैल जप्त, गुन्हा दाखल

 चोपडा येथे जनावरांची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन बैल जप्त, गुन्हा दाखल  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पोलिसांनी जना...

 चोपडा येथे जनावरांची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन बैल जप्त, गुन्हा दाखल 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहर पोलिसांनी जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या प्रकरणात कारवाई करत वाहनासह दोन बैल जप्त केले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 3.20 वाजण्याच्या सुमारास चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील यावल रोड परिसरात ही घटना घडली. एका पांढऱ्या रंगाच्या छोट्या मालवाहू वाहनातून (क्रमांक MH-19-CY-6349) दोन बैलांची क्रूरतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन थांबवून तपासणी केली असता, बैलांना अत्यंत अरुंद जागेत कोंबून, दोरखंडाने बांधून व कोणतीही योग्य काळजी न घेता वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे जनावरांना गंभीर इजा होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी संबंधित चालक व मालकांविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये सुमारे 4 लाख रुपये किमतीचे वाहन तसेच अंदाजे 80 हजार रुपये किमतीचे दोन बैल यांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहॅकॉ संदीप भोई करत असून अशा प्रकारच्या अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

No comments