adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलच्या वृद्धाश्रमात महिलेने केला वाढदिवस साजरा करीत वृद्धांचा केला पाहुणचार.

 यावलच्या वृद्धाश्रमात महिलेने केला वाढदिवस साजरा करीत वृद्धांचा केला पाहुणचार. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : शहरातील वि...

 यावलच्या वृद्धाश्रमात महिलेने केला वाढदिवस साजरा करीत वृद्धांचा केला पाहुणचार.

भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : शहरातील विस्तारित भागात बालाजी सिटी मध्ये असलेल्या यशोदाआई वृद्धाश्रमात शहरातील रहिवासी महिलेने आपला वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसावर वायफळ खर्च न करता येथील वृद्धांना त्यांनी पाहुणचार करीत त्यांच्यासोबत दिवस घालवला आणि समाजापुढे आदर्श ठेवला या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे

यावल शहरात विस्तारित भागात भुसावळ रोड लगत बालाजी सिटी मध्ये यशोदा आई वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमामध्ये यावल येथील रहिवासी स्मिता प्रशांत भोईटे यांनी आपला वाढदिवस साजरा केला येथील वृद्धांच्या सोबत त्यांनी वाढदिवस साजरा करीत वृद्धांना पाहूणचार केला वाढदिवस वायफळ खर्च न करता समाजातील गोरगरीब गरजूंना आपण त्यातून मदत केली पाहिजे या विचारातून त्यांनी हा उपक्रम राबवला असे त्यांनी सांगीतले व येथील जेष्ठ वृद्धांसोबत त्यांनी दिवस घालवला त्यांच्यासोबत जेवण देखील केले त्यांचा पाहुणचार केला आणि समाजापुढे आदर्श ठेवला त्यांनी राबवलेल्या या उपक्रमा बद्दल त्यांचे  वृध्दाश्रम अध्यक्ष पंकज बारी, सचिव विजय सावकारे, सभासद राहुल कोळी, पवन राजू पाटील,उपाध्यक्ष नरेंद्र पाटील आदींनी आभार व्यक्त केले आहे.

No comments