श्रीकांत धिवरे यांनी जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली! रणजित मस्...
श्रीकांत धिवरे यांनी जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली!
रणजित मस्के (जळगांव जिल्हा) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत धिवरे यांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून जळगांव पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. श्रीकांत धिवरे हे यापूर्वी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून श्रीकांत धिवरे यांना चांगलेच ओळखले जाते. आता त्यांच्याकडे जळगांव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य शासनाने सोपवली आहे. राज्य शासनाकडून सोमवारी झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांचा कालावधी पूर्णता: झाल्यामुळे त्यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नूतन पोलीस अधीक्षकांनी पदभार घेताच कायदा सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार गुन्हेगारांची गय केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

No comments