adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!

 लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!  ( लातूर जिल्हा) सौ. ...

 लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या! 


( लातूर जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यांत शेत जमिनीच्या आणि मालमत्तेच्या वादांतून अवघ्या 7 वर्षीय पुतण्याचा चुलतीने खून केल्याची घटना आहे. 19 एप्रिल रोजी समोर आली आहे. ही घटना चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उजळंब रोडवर एका पडक्या घराजवळ घडली आहे. देवांश मंगेश स्वामी (वय 7) खून झालेल्या बालकांचे नाव आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपी चुलती अनिता दिनेश स्वामी (वय 34) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी महिलेने स्वतःच्याही मुलाला बेपत्ता करून आगळावेगळा बहाणा करीत शेत जमिनीच्या आणि मालमत्तेच्या वादांतून अवघ्या सात वर्षाच्या पुतण्याचा खून केला आहे. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत संशयित चुलती अनिता दिनेश स्वामीला प्रथम दर्शनी ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता तिने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना अवघ्या 17 तासांत या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.  सदर गुन्ह्याचा तपास बालाजी भंडे करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तपास करीत आहेत.

No comments