कमला नेहरू मुलींच्या वसतिगृहात ग्लुकोज पावडर वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक – हेमकांत गायकवाड): चोपडा येथील कमला नेहरू मुलींच्या वसतिगृहात ...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक – हेमकांत गायकवाड):
चोपडा येथील कमला नेहरू मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी ग्लुकोज पावडर, खाद्यपदार्थ व जूस वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. तापी सुगीराणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील आणि संताजी प्रतिष्ठान, चोपडाचे अध्यक्ष देवकांत चौधरी यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी के. डी. चौधरी, रवी पाटील तसेच वसतिगृहाचे संचालक महेश शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच दिल्ली येथील माँ कर्मादेवी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करून पुरुषोत्तम राठोड व तान्या राठोड यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय वसतिगृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. शेवटी महेश शिरसाठ यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

No comments