फैजपूरचे एपीआय रामेश्वर मोताळे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती; कर्तव्यदक्ष सेवेची दखल इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...
फैजपूरचे एपीआय रामेश्वर मोताळे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती; कर्तव्यदक्ष सेवेची दखल
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर:- फैजपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत असलेले रामेश्वर मोताळे यांना गृह विभागातर्फे पोलीस निरीक्षक (PI) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह फैजपूर व यावल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोताळे यांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ठसा उमटवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर वचक बसवणे तसेच विविध गुन्ह्यांची प्रभावी उकल करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच सामान्य नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखून विश्वास संपादन करण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले.
त्यांच्या उत्कृष्ट सेवेला आणि कार्यक्षमतेला दखल देत पोलीस प्रशासनाने त्यांना निरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीची बातमी समजताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच फैजपूर येथील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पोलीस पाटील ग्रुपतर्फेही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नवीन जबाबदारीतही मोताळे यांचे कार्य अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments