adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यादरम्यान (ड्युटी) हेल्मेट अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

 कर्तव्यादरम्यान (ड्युटी) हेल्मेट अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई   मुंबई प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुंबई...

 कर्तव्यादरम्यान (ड्युटी) हेल्मेट अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई  




मुंबई प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई, दि. 09 एप्रिल 2026 : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्युटीदरम्यान दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेकडून अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण लक्षणीय आहे. अपघातांमध्ये होणारे मृत्यू व गंभीर दुखापती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, Bloomberg Philanthropies यांच्या Initiative for Global Road Safety अंतर्गत झालेल्या अभ्यासात मुंबई व नागपूर येथे हेल्मेट वापराचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले असले, तरी इतर शहरांमध्ये ते अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 त्यामुळे पोलीस दलाने स्वतः नियमांचे पालन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नवीन आदेशानुसार, ड्युटीदरम्यान दुचाकी चालविताना सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरणे आधीपासूनच सक्तीचे असून, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात येणार असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये तसेच महामार्ग पोलीस यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

No comments