adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची भेट

 गलंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; तथागत भगवान गौतम  बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची भेट  गलंगी, ता. चोपडा (प...

 गलंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; तथागत भगवान गौतम  बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची भेट 


गलंगी, ता. चोपडा (प्रतिनिधी – मच्छिंद्र रायसिंग) :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्त गावातील शांताराम देवराज, दीपक बॅण्डचे संचालक तसेच पोलीस पाटील चारुलता देवराज यांनी बौद्ध समाजासाठी सुमारे ५१ हजार रुपये किमतीच्या तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती मुंबई येथून आणून भेट दिल्या. या उपक्रमातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काजीपुर येथील बुद्धाचार्य रमेश सोनवणे यांनी केले. पंचशील प्रार्थना व आभार प्रदर्शन कैलास रणदिवे, रमेश रणदिवे आणि रोहित रणदिवे यांनी सादर केले. यावेळी समाजातील महिला मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मूर्ती भेट दिल्याबद्दल शांतीलाल देवराज, मालुबाई देवराज, सुनील देवराज व पोलीस पाटील चारुलता देवराज यांचे सर्व समाजबांधव व महिला मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमास माजी सरपंच खटाबाई कोळी, पत्रकार मच्छिंद्र रायसिंग, उदय कोळी, गुलाब कोळी, शरद रायसिंग, कृष्णा देवराज, भैया रायसिंग, रामचंद्र बाविस्कर यांच्यासह गावातील मित्र मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments