adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"पंकज नगर व परिसरातील विजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा सारे रहिवासी २मे रोजी सायंकाळी वीज मंडळावर धडकणार....

 "पंकज नगर व परिसरातील विजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा सारे रहिवासी २मे रोजी सायंकाळी वीज मंडळावर धडकणार....  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-...

 "पंकज नगर व परिसरातील विजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा सारे रहिवासी २मे रोजी सायंकाळी वीज मंडळावर धडकणार.... 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

.. गेल्या महिना भरा पासून चोपडा शहरातील पंकजनगर परिसरातील ग्राहकांना दिवसा वीज जास्त दाबाने व रात्री कमी दाबाने मिळत असून  त्यामुळे रात्रभर कोणतेही पंखे किंवा ए सी चालत नाहीत,विजेची उपकरणे जळत आहेत.

   दुसरीकडे विजेचा दाब कमी झाल्याने प्रवाह(current) मात्र जास्त वाहत असल्याने  बिल मात्र दुपटीने वाढत आहे.

   नागरिकांचा होणारा त्रास व नुकसान टाळावे अशी विनंती वीजमंडळ कडे नागरिकांनी केली तसे निवेदन उपकार्यकारी अभियंता संदीप महाजन, उपकार्यकारी अभियंता किशोर महाजन, सहाय्यक अभियंता दीपक पाटील यांना सोपवले व येत्या चार दिवसात प्रश्न न सुटल्यास शुक्रवारी २ मे २०२७ रोजी सारे नागरिक, महिला मुले बाळ यांच्यासह सायंकाळी धडक देतील असे देखील यावेळी नागरिकांनी सांगितले.

  यावेळी उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, एस बी पाटील, प्रा आर बी वाघजाळे,प्राचार्य ए व्ही पाटील, पत्रकार प्रवीण पाटील, पत्रकार उमेश नगराळे, पत्रकार तुषार सूर्यवंशी, ऋषीदास बाविस्कर, विपीन बोरोले, धीरज महाजन, ॲड कुलदीप पाटील, मोहित बोरोले, राहुल पाटील, सुमित पाटील, गजानन लाडवीकर, काशिनाथ महाजन यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

No comments