विधानपरिषदेसाठी धनगर समाजाला संधी द्या. इंजिनिअर..सचिन सांगोरे युवक जिल्हाध्यक्ष यांची मागणी... चोपडा |प्रतिनिधी (संपादक| हेमकांत गायकवाड)...
विधानपरिषदेसाठी धनगर समाजाला संधी द्या.
इंजिनिअर..सचिन सांगोरे युवक जिल्हाध्यक्ष यांची मागणी...
चोपडा |प्रतिनिधी
(संपादक| हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धनगर समाज कायम महायुती सोबत राहिलेला आहे. जळगाव जिल्ह्यात विधानपरिषदेचे वारे जोमाने वाहत आहेत.आतापर्यंत धनगर समाजाला कोणतीही संधी मिळाली नसल्याने आतापर्यंत धनगर समाज हा वंचित त राहिला असून धनगर समाजाची लोकसंख्या बघता महायुतीच्या नेत्यांनी धनगर समाजाला विधानपरिषदेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी तालुक्यातील युवा नेतृत्व इंजिनियर सचिन सुभाष संगोरे(ऑल इंडिया धनगर समाज युवक जिल्हाध्यक्ष महासंघ रजिस्टर, नवी दिल्ली) यांनी केली असून आदिवासी भागाला व जिल्ह्याला न्याय द्यावा अशी माहीती त्यांनी दिली. यासाठी वरिष्ठांना पत्र देऊन न्याय मागू असे ही त्यांनी सांगितले.
सचिन सांगोरे हे सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असतात.आदिवासींच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारं युवा नेतृत्व आहे. जळगाव जिल्ह्याची धनगर समाजाची लोकसंख्या बघता आम्हाला योग्य न्याय द्यावा असेही त्यांनी सांगितले.त्यांच्या या मागणीला तालुक्यातील धनगर समाजातील राहुल भालेराव,नंदलाल धनगर माजी सरपंच वरडी,भागवत सर,हटकर सर, योगेश कंखरे,महारु सुल्ताने, लहुश न्हयदे,समाधान धनगर,गणेश न्याहळदे,उमेश शिरसाठ,अमोल बोरसे,महेंद्र पाटील,प्रवीण सावळे,निलेश धनके,अनुप पांढरे,आबा ठाकरे,सतीश चिंचोरे अश्या असंख्य धनगर समाजाच्या वतीने सचिन संगोरे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला असून तसे झाल्यास वंचित असलेल्या धनगर समाजाला न्याय मिळेल.


No comments