सुमय्या अली यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; प्रशिक्षणार्थ्यांना थकीत वेतन मिळाले बुलढाणा | अमोल बावस्कार (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महार...
सुमय्या अली यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; प्रशिक्षणार्थ्यांना थकीत वेतन मिळाले
बुलढाणा | अमोल बावस्कार
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांचे तब्बल तीन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन अखेर वितरित करण्यात आले असून, यामागे नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
याबाबत सुमय्या अली यांनी जिल्हाधिकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की, राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात यावे. अन्यथा, नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना तीन महिन्यांचे थकीत वेतन देण्याची कार्यवाही केली. त्यामुळे राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वेतन मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सुमय्या अली यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली आहे.

No comments