सौ .नीता यशवंत वायकोळे यांना पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...
सौ .नीता यशवंत वायकोळे यांना पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकोला:- महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ महिला उपाध्यक्ष विदर्भ विभाग व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला सदस्य व सकल लेवा महिला मंडळ भुसावळ अधिकृत सदस्य सौ. नीता यशवंत वायकोळे (अकोला) यांना पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 देण्यात आला.डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान (नीती आयोग भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ उद्याम मंत्रालय संलग्नित व पूजनीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आरंभीत नीती आयोग भारत सरकार संलग्नित व राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्यवतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कार्यां अन्तर्गत सौ.निता वायकोळे, गरजू, अनाथ लोकांना, मुलां मुलींना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत असतात, दिव्यांगांना सर्वतोपरी सहाय्य करतात, गरजू स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्या सतत मदत करत असतात.रॉबिन हूड आर्मी या इंटरनॅशनल एनजीओ अंतर्गत कार्य करतात. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान करत असतात.या सर्व समाजसेवेतील योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक हिंदू रत्न डॉक्टर रवींद्र भोळे सर व खादी आणि ग्रामोद्योग मंत्री माननीय रवींद्र साठे सर व इतर वरिष्ठ मान्यवरांचे हस्ते 27 एप्रिल 2026 ला सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पुणे येथे प्रदान करण्यात आला. समाज कार्य करताना त्यांना त्यांच्या परिवाराचा, समाजाचा नेहमीच पाठिंबा मिळतो .पती श्री. यशवंत बाबुराव वायकोळे ,मुलगा कुशल, सून उर्मी ,मुलगी सौ. राजश्री, जावई श्री. गिरीश बऱ्हाटे,भाची अमृता पाटील तसेच पुतण जावई डॉक्टर दीपक लोखंडे यांचे योगदान मिळत असते, रॉबिनहूड आर्मी टीम अकोला चे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक श्री.विशाल कोरडे सर व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व भ्रातृमंडळ मंडळ अकोला यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद मानतात.व भविष्यातही त्या सर्वांना मदत करण्यासाठी कटिबद्ध राहतील.

No comments