adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..प्रवासात दागिने चोरणाऱ्या महिलेला बेड्या.. पोलिसांनी सराफ व्यावसायिकाकडून २५ लाखांचे सोने केले जप्त..

 कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..प्रवासात दागिने चोरणाऱ्या महिलेला बेड्या.. पोलिसांनी सराफ व्यावसायिकाकडून २५ लाखांचे सोने  केले जप्त.. सचिन ...

 कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..प्रवासात दागिने चोरणाऱ्या महिलेला बेड्या.. पोलिसांनी सराफ व्यावसायिकाकडून २५ लाखांचे सोने  केले जप्त..


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-एका महिला प्रवाशाचे एसटी बसमधून चोरीला गेलेले तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने शोधण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी माया कल्याण भोसले (वय ३६, रा. हातगाव, ता. शेवगाव) या महिलेला अटक केली असून, तिच्याकडून २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.फिर्यादी मिनाबाई ज्ञानदेव बडाख (वय ५७, रा. करजगाव, ता. नेवासा) या ७ एप्रिल २०२६ रोजी वाकडवाडी एसटी स्टँडवरून बसने प्रवास करत होत्या.प्रवासा दरम्यान त्यांच्या बॅगेत ठेवलेले २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिला माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान तिने दागिने चोरी केल्याची कबुली दिली.तिने चोरलेले सोने बोधेगाव येथील सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे याला दिले होते. पोलिसांनी या सराफ व्यावसायिकाकडून चोरीचे सर्व दागिने (किंमत २५,००,०००/- रुपये) जप्त केले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि.कुणाल सपकाळे,पोसई. गणेश देशमुख,पोलीस अंमलदार दौंड,विशाल दळवी,विनोद बोरगे, राहुल शिंदे,साबीर शेख,रोहिणी दरंदले,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अमोल गाडे,अतुल काजळे, शिरीष तरटे,अतुल कोतकर, राहुल मासाळकर,महेश पवार, रमेश शिंदे,अतुल लाटे,कविता साठे,पल्लवी रोहकले,दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments