adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील सम्राट मॉल परिसरात महामानव ...

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील सम्राट मॉल परिसरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचायत समितीचे माजी सेवानिवृत्त अधिकारी श्री. बोदडे नाना यांनी बौद्ध वंदना सादर केली. यामुळे कार्यक्रमाला धार्मिक व प्रेरणादायी वातावरण लाभले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, भगतसिंग बापू पाटील, प्रा. मुकेश येवले, नगरसेवक राकेश कोलते, बाळासाहेब फेगडे, योगेश चौधरी, उमेश फेगडे, मुन्ना पाटील, अतुल भालेराव, संजय भोईटे, चेतन आढळकर, गणेश महाजन, अरुण लोखंडे, आशिष पाटील, सर विवेक दुसाने, कदीर खान, चेतन फेगडे, विष्णू भालेराव, सोपान इंगळे, विलास चौधरी, राजेश श्रावगी आदी मान्यवरांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले.

No comments