यावल बसस्थानकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:– महामानव भारतरत्न डॉ. बाबासा...
यावल बसस्थानकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल:– महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त यावल येथील बसस्थानकाच्या वतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी बसस्थानकाचे मॅनेजर दिलीप महाजन, सहाय्यक वाहतूक अधीक्षक संदीप अडकमोल, संदीप तायडे, यावल येथील सामाजिक युवा कार्यकर्ते विलास भास्कर, कोरपावली येथील सरपंच विलास अडकमोल, शिवसेनेचे कार्यकर्ते भरत चौधरी यांच्यासह आनंद इंधांटे, प्रशांत सावळे, रोशनी सोनवणे, प्रतिभा इंधांटे, अंजू वाणी, पिंकी तायडे, जयश्री तायडे, कडू तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बसस्थानकातील कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अवनी तायडे या लहान मुलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी प्रभावी मनोगत व्यक्त केले. तिच्या सादरीकरणाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बौद्धेचारी मेश्राम यांनी केले. तसेच जयंतीनिमित्त अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक व प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

No comments