जनावरांची चोरी करणाऱ्या आरोपींच्या टेम्पोसह पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 4.15.000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत;पेठ बीड पोलिसांची कामगिरी! (बी...
जनावरांची चोरी करणाऱ्या आरोपींच्या टेम्पोसह पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 4.15.000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत;पेठ बीड पोलिसांची कामगिरी!
(बीड जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बीड जिल्ह्यातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघां आरोपींच्या पिकअप टेम्पोंसह पोलिसांनी जनावरे चोरी करण्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत तिघां आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 15.000 रूपये किंमतीच्या तर 4.00000 रूपये किंमतीची पिकअप हस्तगत करण्यात आली आहे. पेठ बीड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहिंतीच्या आधारे जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक खेडकर यांनी आपल्या स्टाफसह सापळा लावून सदर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरांची जनावरे आढळून आली. पेठ बीड पोलिसांनी या तिघांना पोलीस ठाण्यात आणून अधिक विचारपूस केली असता या तिघां आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. १)अशीम शहजवान,२)अजि आझाद ३)कुरेशी शहजवान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर महा.प्राणी अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपींना ताब्यात घेवुन 4.15.000/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा सुभाष मोठे नितेश माने अजित शितोळे विष्णू गुजर अशोक परझने शिवाजी राख आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. पेठ बीड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गातून देखील विशेष कौतुक होत आहे.

No comments