नांदेडच्या एलसीबी पदावर अतुल भोसले यांची नियुक्ती, नांदेडच्या एलसीबी पदावर खमक्या अधिकाऱ्याची एन्ट्री ! (नांदेड जिल्हा) सौ. अनुजा कारखेले...
नांदेडच्या एलसीबी पदावर अतुल भोसले यांची नियुक्ती, नांदेडच्या एलसीबी पदावर खमक्या अधिकाऱ्याची एन्ट्री !
(नांदेड जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक हेमकांत गायकवाड)
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा नव्याने बदल दिसून आला आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचा कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस खात्यात एलसीबीची खुर्ची ही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या खुर्चीसाठी अनेक अधिकारी नेहमीच फिल्डवर दिसून येतात. त्याकरता अधिकारी देखील देव पाण्यात ठेवून होते. खुर्चीची प्रतीक्षा करीत असतात. पण भोसले यांच्या नावावर अखेर पोलीस अधीक्षकांनी शिक्कामार्फत केला. भोसले यांनी पदभार स्वीकारला असला तरी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे आहेत. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस प्रशासनातील विश्वास पुनस्थापित करणे, ही त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची ही नेहमीच संवेदनशील आणि दबावाखाली काम करणारी मानली जाते. त्यामुळे भोसले यांच्या नियुक्तीमुळे या विभागाला नवे वळण मिळणार असल्याचे अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी यापूर्वी नवी मुंबई पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण तसेच एसीबी पुणे अशा विविध ठिकाणी काम पाहिल्यामुळे त्यांचा दांडगा अनुभव मानला जात आहे. तर अतुल भोसले यांच्या रिक्त झालेल्या बिलोली पोलीस ठाणेत प्रभारी अधिकारी म्हणून बाळासाहेब रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments