adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून घिर्णी व बेलाड ग्रामस्थ आक्रमक; वसंता बाबुराव चित्रंग व घिर्णी-बेलाड ग्रामवासी यांचे बेमुदत साखळीउपोषण

 वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून घिर्णी व बेलाड ग्रामस्थ आक्रमक; वसंता बाबुराव चित्रंग व घिर्णी-बेलाड ग्रामवासी यांचे बेमुदत साखळीउपोषण अमोल बाव...

 वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून घिर्णी व बेलाड ग्रामस्थ आक्रमक; वसंता बाबुराव चित्रंग व घिर्णी-बेलाड ग्रामवासी यांचे बेमुदत साखळीउपोषण


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मलकापूर:-  विभागातील घिर्णी व बेलाड गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने वसंता बाबुराव चित्रंग घिर्णी-बेलाड ग्रामवासी यांनी बेमुदत साखळी आमरण उपोषण सुरू केले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची ठाम मागणी करण्यात येत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरापासून सिंगल फेज लाईन १४-१ ४तास बंद राहत आहे, तर थ्री फेज लाईन देखील नियमितपणे सुरू होत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

याशिवाय, थ्री फेज लाईनवरील तारा जास्त भारामुळे वारंवार ट्रिप होत असल्याची समस्या देखील ग्रामस्थांनी मांडली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा सुरू असून लाईट नसल्यामुळे अभ्यासात खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास न झाल्यामुळे कमी गुण मिळाल्यास याला जबाबदार कोण?महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर दिनांक २९ मार्च सोमवारपासून नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला परंतु कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व समस्यांच्या निषेधार्थ वसंता बाबुराव चित्रंग व घिर्णी बेलाड ग्रामवासी यांनी बेलाड सब स्टेशन समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला घिर्णी व बेलाड गावातील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.ग्रामस्थांची मुख्य मागणी अशी आहे की,सिंगल फेज लाईन तात्काळ सुरू करण्यात यावी

थ्री फेज लाईन सुरळीत व नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, उपाध्यक्ष बाळूभाऊ ठाकरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, वसंता चित्रंग अमोल चोपडे सर, धनराज ढोन, गजानन चोपडे अनंता तांगडे प्रशांत संबारे तुळशीराम चोपडे कृष्णा चव्हाण संतोष चोपडे भागवत भोपळे विष्णू सुशीर राजू भोपळे सुरेश चोपडे महादेव बगाडे शिवलाल बघे ज्ञानेश्वर संबारे प्रशांत संबारे कडू संबारे व  इतर गावकरी उपस्थित होते.

No comments