माजी सैनिक संघर्ष समितीची मासिक मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न शौकतभाई शेख /श्रीरामपूर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीरामपूर ताल...
माजी सैनिक संघर्ष समितीची मासिक मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
शौकतभाई शेख /श्रीरामपूर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर तालुक्यातील माजी सैनिक संघर्ष समितीची मासिक मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. मागील मिटींगचे इतिवृत्त व संघटनेचा जमा खर्च संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांनी वाचून दाखवला, मिटिंगमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले उदा.माजी सैनिक पाल्यांना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शैक्षणिक कालावधीत मिळत असलेल्या १) चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स (सी.ई.ए.) आणि शिष्यवृत्ती बाबत वेळेपुर्वी लागु असलेले कागदपत्र जमा करणे,२) सैनिकी सर्व कागदपत्रांमध्ये पत्नीचे मुलांचे व आपले सैनिकांचे संपूर्ण नांव जन्म दिनांकांची नोंद आहे की नाही त्याची शहनिशा करून दुरुस्ती करून घेणे, ३) विधवा पत्नींना ज्या सुविधा लागू आहेत त्या मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मदत करणे, ४) नुकतेच दिवंगत झालेल्या माजी सैनिकांच्या पत्नींस फॅमिली पेन्शन मिळणे कामी लागत असलेले सर्व कागदपत्रांबद्दल माहिती देऊन मदत करणे,
५) गेल्या मासिक मिटींगमधे ठरल्याप्रमाणे ज्या माजी सैनिकांचे वाढदिवस आहेत त्यांचे त्रैयमासिक वाढदिवस येथून पुढे नितनियमाने संघटनेच्या माजी सैनिकांच्या परिवारासमवेत साजरे करणे, त्याप्रमाणे काळे लॉन येथे सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या समवेत माजी सैनिक चंदू बडाख, मंगेश यादव , सुनील गवळी , विलास खर्डे , रवींद्र कुलकर्णी, रामधन बिलवाल, व संतोष गोरे यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व भोजनासह मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
याबरोबरच या मिटिंगमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे माजी सैनिक महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली तसेच पदाधिकारी निवड अध्यक्षा- श्रीमती सुवर्णा दत्तात्रय दरेकर , सचिव- वैशाली बद्रीनाथ देशमुख व खजिनदार- सौ.गितांजली रवींद्र कुलकर्णी या नवीन बचत गटाला (विरांगणा) महिला बचत गट असे नांव देण्यात आले, बचत गटाचे फायदे , तोटे, मिळणारे केंद्र व राज्य तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडून मिळत असलेल्या अनुदानाबाबत मेजर कृष्णा सरदार यांनी इतंभूत माहिती दिली. याप्रसंगी संघटनेचे माजी सैनिक आपल्या परिवारातील सर्व सदस्यांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेजर बाळासाहेब भागडे यांची कन्या कु.प्रतिक्षा हिने केले.
वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments