राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय! भाजपाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर सचिन मोकळं अ...
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय! भाजपाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अखेर अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राहुरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. कर्डिले यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना संधी देत भाजपने अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कर्डिले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तनपुरे यांची नाराजी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे.या पार्श्वभूमीवर राहुरी मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे संभाव्य अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आणखी वाढणार आहे. राहुरी पोटनिवडणूक आता केवळ औपचारिक न राहता प्रतिष्ठेची लढत ठरण्याची शक्यता असून, येत्या काळात राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments