adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हनुमान जयंतीनिमित्त यावलमध्ये महर्षी व्यासनगरी विराट हिंदू संमेलनाची जय्यत तयारी; धर्मध्वज स्थापना, भारत माता व गदा पूजनाने वातावरण भक्तिमय

हनुमान जयंतीनिमित्त यावलमध्ये महर्षी व्यासनगरी विराट हिंदू संमेलनाची जय्यत तयारी; धर्मध्वज स्थापना, भारत माता व गदा पूजनाने वातावरण भक्तिमय ...

हनुमान जयंतीनिमित्त यावलमध्ये महर्षी व्यासनगरी विराट हिंदू संमेलनाची जय्यत तयारी; धर्मध्वज स्थापना, भारत माता व गदा पूजनाने वातावरण भक्तिमय 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 श्री बालाजी मंदीर यावल येथे श्री हनुमान जयंतीच्या शुभदिनी  भारत मातेच्या प्रतिमा पूजन व गदा पूजन  करण्यात आले. धर्मध्वजाची स्थापना करून महर्षी व्यासनगरी विराट हिंदू संमेलनाच्या तयारीला औपचारिक सुरुवात करण्यात आली. विराट हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजात एकता, जात, भाषा व पंथ यांचा भेदभाव विसरून सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम व हिंदू समाजातील सर्व संत-महंत यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम पार पडत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गौतमजी खट्टर, संस्थापक सनातन महासंघ विराट हिंदू संमेलनाचे मुख्य कार्यक्रम दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीबालाजी मंदीर, समोरील मैदान भुसावळ रोड येथे पार पडणार असून संमेलनात संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन विराट हिंदू संमेलन निर्वाहन समिती कडून करण्यात आले आहे.

No comments