चोपडा पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक देसले साहेब यांचे उत्साहात स्वागत चोपडा (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री श्याम धणी स...
चोपडा पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक देसले साहेब यांचे उत्साहात स्वागत
चोपडा (प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री श्याम धणी सेवा फाउंडेशन, चोपडा यांच्या वतीने चोपडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा. श्री. देसले साहेब यांचे उत्साहपूर्ण आणि आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात फाउंडेशनच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ अर्पण करून देसले साहेबांचा सन्मान केला. यावेळी उपस्थितांनी समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत, आगामी काळात पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून काम करण्याची भूमिका मांडली. यावेळी पोलीस निरीक्षक देसले सरांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments