आमोदा येथील बौद्ध समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा; निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
आमोदा येथील बौद्ध समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा; निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील आमोदा येथे जातीय द्वेषातून घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ बौद्ध समाजाच्या नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन प्रांत कार्यालयावर धडकला. मोर्चात बौद्ध समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमोदा येथे घडलेल्या गंभीर घटनांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वास्तविक आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, बौद्ध वस्तीत हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तक्रारदारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावेत, प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, संबंधित प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न आणता निष्पक्ष न्याय द्यावा तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments