LCB ची धडाकेबाज कारवाई..! राशीनमध्ये ६२ गोवंशीय जनावरांची सुटका ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
LCB ची धडाकेबाज कारवाई..! राशीनमध्ये ६२ गोवंशीय जनावरांची सुटका ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत तालुक्यातील राशीन येथे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेली जाणारी ६२ गोवंशीय जनावरे जप्त केली आहेत.या कारवाईत गुन्हे शाखेने जनावरांसह तीन वाहने असा एकूण ६५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलखान्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कर्जत भागात गस्त घालत होते.२२ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास,राशीन येथील कुरेशी गल्लीत काही लोक टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून ती कत्तलीसाठी बाहेर पाठवण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.पोलीस छापा आणि थरार माहिती मिळताच पथकाने तातडीने कुरेशी गल्लीत छापा टाकला.पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला,मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून फरदीन रफीक कुरेशी (वय २२) याला जागीच पकडले. तपासा दरम्यान त्याने ही जनावरे अन्वर कुरेशी,साहिल कुरेशी आणि इरफान उर्फ बबलू कुरेशी (सर्व रा.राशीन) यांच्या मालकीची असून ती धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे कत्तलीसाठी नेली जात असल्याची कबुली दिली.गोवंशीय जनावरे: ६२ नग (किंमत १८,३५,००० रुपये)
वाहने:३ टेम्पो (किंमत ४७,००,००० रुपये)
एकूण मुद्देमाल: ६५,३५,००० रुपये,गुन्हा दाखल व फरार आरोपींचा शोध
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याविरोधी कायद्यानुसार (कलम ५(अ), ५(ब), ९ आणि ३, ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एक आरोपी अटकेत असून इतर तीन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,गणेश लबडे,अतुल लोटके,रोहित येमुल,भाऊसाहेब काळे आणि चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.अवैध कत्तल आणि प्राणी तस्करी करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले असून,स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments