अंतुर्लीत विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली: - अंतुर्ली व परिसरात...
अंतुर्लीत विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली: - अंतुर्ली व परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्याच्या तीव्रतेत वाढ झालेल्या या दिवसांत विजेच्या सततच्या खंडामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने घरगुती कामे, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतर ती बराच वेळ परत येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप परिस्थितीत कोणताही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढत असून, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments