आमोदा येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आमोदा...
आमोदा येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आमोदा:- साकेत बुद्ध विहार, आमोदा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे शिबीर दिनांक २३ मार्च ते १ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. समारोप प्रसंगी केंद्रीय शिक्षिका आदरणीय लताताई तायडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे तसेच भिक्खू संघातील भंते भदंत तंकर व भंते शीलरत्न यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना धूप-दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बौद्धाचार्य बी. डी. महाले व केंद्रीय शिक्षक शैलेंद्र जाधव यांनी भिक्खू संघाला याचना केली. त्यानंतर भिक्खू संघाने उपस्थित धम्म उपासक-उपासिकांना शील प्रदान केले. शिबिरादरम्यान सहभागी महिलांनी आपल्या अनुभवांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात छाया नवल तायडे, मीनाक्षी मेढे, आम्रपाली तायडे, शांताबाई तायडे, ज्योती तायडे यांच्यासह जिल्हा संघटक ए. टी. सुरडकर, सीमा अहिरे व शैलेंद्र जाधव यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. तसेच संजना ताई तायडे, प्रतिभाताई सोनवणे, भुसावळ शहराध्यक्ष सरचिटणीस सुरेखा गायकवाड व जिल्हा संघटक जयश्री जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. समता सैनिक दलाचे पदाधिकारी संजय साळवे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली, तर बौद्धाचार्य कवडीन्य मेश्राम यांनी महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भिक्खू संघानेही धम्मविषयक सखोल मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सगुनाबाई सुधाकर तायडे, कमलाबाई प्रभाकर तायडे, चंद्रकला यशवंत तायडे, रमाबाई वसंत भागेश्वर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यावल तालुका महिला विभाग अध्यक्ष मायाताई सुरेश तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धम्म सेवक महेंद्र तायडे यांनी मानले. समारोप प्रसंगी सर्व सहभागी महिलांना प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments