adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा लाखोंचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद;गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा लाखोंचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद;गुन्हे शाखेची मोठी कारवाई  लातूर,जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत ग...

 प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा लाखोंचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद;गुन्हे शाखेची मोठी कारवाई 


लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या 

 ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे, रा. चाकूर) यास ताब्यात घेतले.गोडाऊनची झडती घेतली असता झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये—NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 06 पोती, Extra Freshness नावाची 03 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

No comments