पत्नीच्या विनयभंग प्रकरणात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या....जळकोटमध्ये २ पोलिसांसह ६ जणांवर गुन्हा दाखल.. लातूर,जि. प्र.(उत्तम म...
पत्नीच्या विनयभंग प्रकरणात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या....जळकोटमध्ये २ पोलिसांसह ६ जणांवर गुन्हा दाखल..
लातूर,जि. प्र.(उत्तम माने )
(संपादक हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे… पत्नीच्या विनयभंगाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, या मानसिक तणावातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे… विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून तसेच संबंधित पोलिसाचे नाव हातावर लिहून आपली वेदना व्यक्त केली… या प्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात २ पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे… २१ फेब्रुवारी रोजी मृत शेतकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग झाल्याचा आरोप असून, याबाबत तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता… उलट तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे… तसेच, गुन्हा नोंदवण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप समोर आला आहे… या सर्व मानसिक तणावाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली… दरम्यान, या प्रकरणी संबंधित आरोपीसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

No comments