adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा शहरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.

 निलंगा शहरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.  लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लातूर जिल्ह्यातील,निलं...

 निलंगा शहरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी. 


लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर जिल्ह्यातील,निलंगा : सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निलंगा शहरातील सावता माळी चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास निलंगा नगरीचे नगराध्यक्ष श्री संजयराज हलगरकर, भाजप शहराध्यक्ष श्री रवी फुलारी, नगरसेवक श्री निळकंठ पेठकर, माजी नगरसेवक व सभापती श्री शरद पेटकर, भाजपा मीडिया अध्यक्ष श्री सुमित इनानी यांच्यासह गणेश पेठकर, आकाश पेठकर, कृष्णा पेठकर, लक्ष्मण फुलसुंदर, आनंद पेठकर, नवनाथ पेठकर, नागनाथ पेठकर, शिवाजी दापके आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माळी सदमाजातील व इतर समाजातील नागरिक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन समाजात समता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा संदेश दिला.

No comments