adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चर्चा नको,आता कृती! उपमहापौर धनंजय जाधवांच्या पुढाकारातून 'ग्रीन सिटी' मोहिमेचा बिगुल वाजणार... वर्षभरात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

 चर्चा नको,आता कृती! उपमहापौर धनंजय जाधवांच्या पुढाकारातून 'ग्रीन सिटी' मोहिमेचा बिगुल वाजणार... वर्षभरात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्...

 चर्चा नको,आता कृती! उपमहापौर धनंजय जाधवांच्या पुढाकारातून 'ग्रीन सिटी' मोहिमेचा बिगुल वाजणार... वर्षभरात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल आणि वाढते तापमान यावर मात करण्यासाठी केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. हेच ओळखून अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून 'ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी' मोहिमेचा भव्य शुभारंभ १ मे - महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत आगामी एका वर्षात शहरात १ लाख वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचा ऐतिहासिक संकल्प सोडण्यात आला आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत होणार सोहळा

अहिल्यानगर महानगरपालिका आणि साईद्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता नगर-मनमाड रोडवरील माऊली सभागृह येथे होणार आहे.याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.वृक्षारोपणाचे महत्त्व सर्वांना माहित आहे, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण मागे पडतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि शहराला हिरवेगार करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे," असे मत आयोजक उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर ती जगवण्यावर (संवर्धनावर) या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे.अहिल्यानगरमधील सर्व वृक्षप्रेमींनी आणि नागरिकांनी या पर्यावरण पूरक मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या हरित क्रांतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments