adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

२७ एप्रिल रोजी चोपड्यात भव्य गो सम्मान शोभा यात्रा. गो प्रेमिचा प्रचंड उत्साह. पत्रकारांचा सक्रिय पाठिंबा

 २७ एप्रिल रोजी चोपड्यात भव्य गो सम्मान शोभा यात्रा. गो प्रेमिचा प्रचंड उत्साह. पत्रकारांचा सक्रिय पाठिंबा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...

 २७ एप्रिल रोजी चोपड्यात भव्य गो सम्मान शोभा यात्रा. गो प्रेमिचा प्रचंड उत्साह. पत्रकारांचा सक्रिय पाठिंबा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा -दि. २४ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक संघ सभा गृहात पत्रकार व गो सम्मान आव्हान अभियान कार्यकर्त्यांची सहविचार सभा पार पडली.

तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा पाठिंबा

गो सम्मान आव्हान अभियानाचे कार्यकर्ते के डी चौधरी यांनी तालुक्यात गो सम्मान अभियान राबविले जात आहे. त्याची माहिती दिली. तालुक्यातील प्रमुख नेते माजी विधान सभा अध्यक्ष अरुणलाल गुजराथी, तालुक्याचे आमदार श्री चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार श्री कैलास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री संदीप सुरेश पाटील,पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपनगराध्यक्ष श्री पंकज बोरोले नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील, मार्केट कमिटी सभापती श्री नरेंद्र पाटील, नगरसेवक किशोर चौधरी,प्रताप विद्या मंदिराचे मा मुख्याध्यापक टी एम चौधरी,गो शाळा संचालक चंद्रकांत पाटील, देवकांत के चौधरी, शरद मोरे,ऍड निर्मल देशमुख, ऍड एस डी पाटील, अमृतराव सचदेव, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष श्री दीपक राखेचा,श्री सुनील बरडिया यांचेसह अनेक मान्यवरांनी या अभियानास सक्रिय पाठिंबा दिला आहे. पत्रकार बंधूनी सक्रिय पाठिंबा देत या अभियानास अधिक गतिमान करण्याचा संकल्प व्यक्त केला. तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात बाबा महाहंसजी महाराज, ह भ प सुशिलजी महाराज, लखन तेली,देवकांत के चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, शरद मोरे, सतीश पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी,राजू बडगुजर, जयदेव देशमुख यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला. गावागावात गोमातेचे महत्व पटवून देत 27एप्रिल रोजी गांधी चौक श्रीराम मंदिरचोपडा येथून निघणाऱ्या गो सम्मान शोभा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.यात्रेची जोरदार तयारी झाली असून 5000पेक्षा अधिक गोभक्त सहभागी होतील व 10000पेक्षा अधिक सह्या असलेले निवेदन मा तहसीलदार यांचे मार्फत म राष्ट्रपती भारत सरकार, म पंत प्रधान भारत सरकार, म राज्यपाल साहेब महाराष्ट्र सरकार, मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येणार आहे. निवेदणाद्वारे गो सेवा, गो सुरक्षा व गो सम्मान यासाठी संपूर्ण देशात एकच कायदा करावा अशा प्रमुख मागण्या आहेत. गो हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी आहे. के डी चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, जण माणसात अभियानाने जोर घेतला असून 27एप्रिल रोजी गो भक्त गो सम्मान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत. शोभा यात्रा अतिशय शांततेत निघणार असून गो मातेचा जयजयकार करत गांधी चौकातून ऍड संदीप पाटील यांचे घरावरून पुढे मा अरुणभाई यांचे घरासमोरून गुजराथी गल्ली रथ गल्ली, गोल मंदिर बाजारपेठ, शनिमंदिर, डॉ बाबासाहेब यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून म तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात पोहचेल. शोभा यात्रेत संत, महंत, कीर्तनकार महाराज, ह भ प भजनी मंडळ, गोभक्त सहभागी होणार आहेत. शोभयात्रेचे गोप्रेमी फार मोठ्या प्रमाणात स्वागत करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ठिकठिकाणी स्वागताचे फलक, रांगोळ्या काढून स्वागत होणार आहे. रस्त्यात काही गो प्रेमी पाण्याची व्यवस्था, फलाहाराची व्यवस्था करणार आहेत. शोभा यात्रेचे गो प्रेमी जोरदार स्वागत करणार असल्याची माहिती के डी चौधरी यांनी दिली. सर्व गोप्रेमीनी याशोभा यात्रेत सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन गो सम्मान अभियानाद्वारे करण्यात आले आहे.

No comments