चोपडा ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई : अवैध पिस्तूल व काडतुसे जप्त, दोन आरोपी अटकेत चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...
चोपडा ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई : अवैध पिस्तूल व काडतुसे जप्त, दोन आरोपी अटकेत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १३:२८ वाजता कृष्णापुर गावाच्या शिवारात, मामलदे रस्त्यावर करण्यात आली.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याचे उघड झाले होते.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल कुवरसिंग पावरी(वय २२,रा.उमर्टी,ता.चोपडा,जि.जळगाव)आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८,रा.असोला,ता.औंढा नागनाथ,जि. हिंगोली) अशी आहेत.
या प्रकरणी सीसीटीएनएस गु.र. नं. ५९/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
एक गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) — किंमत ₹२५,०००,०५ जिवंत काडतुसे — किंमत ₹५,०००,हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल — किंमत ₹२५,०००,ओपो कंपनीचे दोन मोबाईल फोन — किंमत ₹१४,०००
गुन्हा सायंकाळी १७:०७ वाजता नोंदविण्यात आला असून आरोपींना त्याच दिवशी २०:०५ वाजता अटक करण्यात आली.फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब एकनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तत्काळ कारवाई करण्यात आली.आरोपींकडे कोणतीही वैध परवानगी नसताना त्यांनी गावठी पिस्तूल व काडतुसे बाळगली होती.ते मोटरसायकलद्वारे शस्त्रांची वाहतूक करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली आहे.पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे व पोलीस कॉन्स्टेबल किरण पारधी करीत आहेत.

No comments