adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महागड्या सोलर केबलवर रेकॉर्डवरील चोरट्यांचा डल्ला..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ४ आरोपी ताब्यात

 महागड्या सोलर केबलवर रेकॉर्डवरील चोरट्यांचा डल्ला..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ४ आरोपी ताब्यात  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-...

 महागड्या सोलर केबलवर रेकॉर्डवरील चोरट्यांचा डल्ला..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ४ आरोपी ताब्यात 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- शिवारात सोलर कंपनीतील महागड्या केबलची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत ४ रेकॉर्डवरील आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ९ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील केबल व कॉपर चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसला आहे.या प्रकरणी फिर्यादी सोमनाथ काशीनाथ तोडमल (वय ३७, रा. जेऊर बायजाबाई, ता. जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १८ मार्च २०२६ सायं. ५ ते १९ मार्च २०२६ सकाळी ९ दरम्यान AVAADA MSKV Tenth Solar SPV Limited या सोलर कंपनीच्या घुरवडी डोंगर परिसरातून ६५०० मीटर केबल, १५०० DC सोलर केबल व ४ मिमी कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याआदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.या पथकात पोउपनि.अनंत सालगुडे,संदीप मुरकुटे,पोलीस अंमलदार विष्णु भागवत,अतुल लोटके,फुरकान शेख,रिचर्ड गायकवाड,भगवान थोरात, विशाल तनपुरे,प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत व चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेंडी बायपास रोडवर किनारा हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला.यावेळी पांढऱ्या रंगाचा पिकअप व मोटारसायकल अडवून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:

संतोष अशोक जाधव (वय २८, रा. हायस्कूल जवळ, प्रवरासंगम, ता. नेवासा)

करण वैश्य भोसले (वय २०, रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. अहिल्यानगर)

मनोज सुनिल लिंभोरे (वय २३, रा. कहार गल्ली, प्रवरासंगम, ता. नेवासा)

परमेश्वर वैश्य भोसले (वय ३९, रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

आरोपी संतोष जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून २०० किलो कॉपर वायर (२ लाख रुपये), महिंद्रा पिकअप (७ लाख), मोटारसायकल (६० हजार), कटर व स्क्रूड्रायव्हर (५०० रुपये) आणि ४ मोबाईल (३१ हजार रुपये) असा एकूण ९,९१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तपासादरम्यान या टोळीने आणखी दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहेत:

गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (गु.र.नं. ७९/२०२६)

येवला, जि. नाशिक (गु.र.नं. १०८/२०२६)

विशेष म्हणजे आरोपी संतोष जाधव व परमेश्वर भोसले हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यांमध्ये दरोडा, दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

No comments