सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन एस. यांनी पदभार स्वीकारला; पती सोलापूर जिल्हाधिकारी तर पत्नी सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी! संभ...
सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन एस. यांनी पदभार स्वीकारला; पती सोलापूर जिल्हाधिकारी तर पत्नी सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी!
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आपल्या सहपत्नीक सोलापुरात येवुन प्रथमता: विठुरायाचे दर्शन घेवुन जिल्हाधिकारी कार्यालयात मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. मावळते जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार हेही सोलापूराकरांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तर आशीर्वाद कुमार यांच्याकडे तर नागपूर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्तिकेयन एस. हे 2020 च्या बॅचच्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी प्रकल्प अधिकारी एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प किनवट नांदेड तर कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. कार्तिकेयन एस. हे सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून आहेत तर त्यांच्या पत्नी योशनी नागराजन या सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या वर्षभरांपासून काम पाहत आहेत. सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी यांनी पदभार घेतला यावेळी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी योशनी नागराजन उपस्थित होत्या. नव्या जिल्हा अधिकाऱ्यांकडून सोलापुरात विकास कामांना चांगलीच देतील अशी अपेक्षा आता सोलापूरकरांकडून व्यक्त होत आहे.

No comments